Tuesday, May 6, 2014

 'जळीमळी' आणि 'नाझिया' चे  मुख्यमंत्र्यांच्या  हस्ते थाटात प्रकाशन 

पणजी, दि. 29 एप्रिल  - पांडुरंग गांवकर यांच्या जळीमळी (मराठी) आणि नाझिया (कोंकणी) या दोन  संग्रहांचे प्रकाशन मुख्यमंत्री मनोहर पार्रिकर यांच्या हस्ते झाले. पणजीत आयोजित केलेल्या य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिकबाब नायक आसले.  लेखिका प्रशांती तळपणकार आणि  साहित्यिक अनील सामंत  खास  वक्ते म्हणून उपस्थित होते.

पांडुरंग गावकर यांचे या पुर्वी दोन  कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. २००३ मध्ये  '…आणि मी  सुद्धा! आणि २००९ मध्ये 'नंतर'. २००६  मध्ये  आणि मी सुद्धाची दूसरी आवृत्ती आली होती.

जळीमळी (मराठी) आणि नाझिया (कोंकणी) या  दोन भाषामधील पुस्तकांमुळे कवी पांडुरंग गांवकर यांची प्रगल्भता स्पष्ट होते. कोंकणी आणि मराठी भाषावादाच्या मधली वाट पांडुरंगने धरली आहे. जी गोमन्तकीय साहित्य विश्वाला सकारात्मक गोष्टींकडे नेणारी आहे.

पांडुरंगने ज्या स्थितीतून स्वत:ला घडवले आणि आज पत्रकारिता आणि साहित्य विश्वात  पद्धतीने ते उभे आहेत ते त्यांच्या प्रामाणिकपणामुळे. बदलत्या जगात त्यांनी आपला  स्वभाव जपावा. त्यांच्या पत्रकारितेत विशेषत: लेखातून  त्यांचीं काव्यशैली अधून मधून झळकते असे मुख्यमंत्री म्हणाले.











---०--
PANAJI, 29 April-  Chief minister Manohar Parrikar today released two poetry collection books written by well known poet Pandurang Gaonkar.
the function was organised in museum hall and preside by well known writer Pundalik Naik. Prashanti Talpankar and Anil Samant deliver speech on book name JALIMALI and NAZIA.
president of GUJ Kishor Naik Gaonkar, Varsha Malvankar and Laxman Gaonkar was also present on the dais.
JALIMALI (Marathi) and NAZIA (Konkani) two books release after 5 years gap. last book name NANTAR was released at the hand of well known Marathi poet Dasoo Vaidya in 2009 in presence of poet and writer Vishnu Wagh and Industrialist Nitin Kunkoliekar and environmentalist Rajendra Kerkar. and first book name '...AANI MI SUDDHA! was published in 2003. '...AANI MI SUDDHA! had its second Edition in 2006.
Chief Minister appreciated poets innocence and his hard working style. while Mr. Pundalik Nayak said pandurang knows book culture and he had command on multilingual literature.
--0--

Monday, April 1, 2013

२००९ नंतर पुन्हा येत्या काही दिवसात माझी दोन  पुस्तके आपल्या भेटीस येत आहेत।

१) नाझिया : (कविता झेलो )
२) गमभन ( कविता संग्रह)

आमंत्रण येईल।

Tuesday, July 13, 2010

"spandan" the poetry collection book of pournima kerkar,s released (पौर्णिमा केरकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन )



प्रसिद्ध कवयित्री पौर्णिमा राजेंद्र केरकर यांच्या 'स्पंदन' कविता संग्रहाचे प्रकाशन माजी वाहतूक मंत्री पांडुरंग राउत यांच्या हस्ते झाले। कला आणि संस्कृति खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्य स्थानी होते।

Friday, May 7, 2010

'नंतर' ला कवी 'बी' पुरस्कार


पांडुरंग गांवकर यांना कवी 'बी' पुरस्कार
पणजी:, दी, ७ (प्रतिनिधि)-
गोमंतकीय युवा कवी पांडुरंग गावकर यांच्या 'नंतर' या कविता संग्रहाला अकोला येथील अंकुर साहित्य संघ या संस्थेतर्फे महाराष्ट्राबाहेरिल कवीला दिला जाणारा कवी 'बी' हा साहित्य पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
नंतर पुस्तकाला याआधी गोमंत विद्या निकेतानाचा साहित्य पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकारचा वाग्मय पुरस्कार प्राप्त झाला असून हा सलग तीसरा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे.
या आधी अंकुर साहित्य संघाचे पुरस्कार प्रकाश क्षीरसागर आणि रमेश वंसकर या गोमंतकीय कवींना प्राप्त झाले आहेत. या पुरस्काराचे वितरण ८ में रोजी जळगांव येथील कुन्हा ककोडा येथील मुक्ताई नगर येथे होत असलेल्या ४६ व्या अंकुर साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.

Saturday, March 20, 2010

'नंतर' ला गोमन्त विद्या निकेतनचा पुरस्कार


पांडुरंग गावकर यांच्या 'नंतर ' कविता संग्रहाला यंदाचा गोमन्त विद्या निकेतनचा साहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे।
२१ मार्च रोजी विद्या निकेतनच्या ९८ व्या वर्धापनदिनी पुरस्काराचे वितरण होणार आहे।

Friday, February 12, 2010

'घंटा' ...वेलंटायन (डे) ची

एकमेकाच्या तोंडातले जंतु चिरडून मारू
जिभेवर जीभ घासु, ओठ फुटतील इतके तापऊ
हात घुसतिल तिथे घुसऊ,
निसर्ग संवर्धनाच्या नावाने
झुडपांची वाट लावू
लावू एकेमेकला ...... सावलीचा लळा
आड़ पडू एकमेकाला सारीत दूर
..... च्या मायला इतके सारे करायला
१४ फेब्रुवारिची पहिली वाट
आणि तासभर दोघांचा तंटा
च्या मारी वेलंटाईन डे चा ****

Friday, December 4, 2009

पांडुरंग गावकर यांना बृहन महाराष्ट्र पुरस्कार


महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृति कार्य संचालनालयाचे उत्कृष्ट वग्मय पुरस्कार जाहिर झालेत। बृहन महाराष्ट्र विभागत पांडुरंग गांवकर यांच्या "नंतर" कविता संग्रहाला सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार जाहिर झाला आहे। रोख २०००० रुपये असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार वितरण १४ फेब्रुवारी रोजी सांगली येथील विष्णुदास भावे सभागृहात होईल। गांवकर यांच्यासह विश्वास पाटील, डॉ। यशवंत मनोहर, न्या नरेंद्र चपळगावकर, किशोरीताई आमोणकर, कविता महाजन, देवेन्द्र कान्दोलकर यांनाही यंदाचे वांग्मय पुरस्कार जाहिर झालेत।
goan young journalist and famous poet mr. pandurang gaonkar bag bruhan maharashtra sahitya award for his poetry collection book name "nantar"